Dinkar Pawar

Others Children

2  

Dinkar Pawar

Others Children

बालपण...

बालपण...

3 mins
139


शाळेतील पहिला दिवस

खेळण्या बागडण्याचं व शाळेत जायचं वय त्या वयातच साधारण 2 ते 3 वर्ष. त्या वयात शाळेत जायचं सोडून मी आक्काच्या पाठी लागून मुंबईला गेलो. (आक्का म्हणजे माझी मोठी बहीण) तिला ही मुलबाळ नसल्यामुळे ती मला घेऊन गेली. मुंबईत आम्ही मुलुंडला राहत असू. माझं खेळण्यात आणि मुलांच्या खोडी काढण्यातच एक वर्ष कसं गेलं समजलं सुद्धा नाही. तिकडे शाळेत जात नसल्यामुळे पुन्हा मला शाळेसाठी गावी (सातारा, पाटण) येथे आणण्यात आलं. घरच्यांना वाटत होतं मी शाळा शिकावी खूप मोठं व्हावं पण मला शाळा म्हटलं की नको वाटायचं, गावात मिळेल त्या ठिकाणी दडून बसायचो. शिक्षकांनी बळजबरी उचलून नेहलचं तर मी पुन्हा: पळवून येऊन गंजीत (जनावरांसाठी चारा एकत्र करून ठेवतात ती जागा) दडून बसायचो. हाच दिनक्रम चालू होता. माझ्या अश्या वागण्यामुळे घरचे माझ्यावर खूप त्रासले होते. खास करून आक्का (माझी मोठी बहीण); आमचा घरासमोर एक वयस्कर महिला राहत होती. तिचे नावं भागाबाई पण आम्ही सगळे तिला भागायनानी म्हणत असु. ह्या दोघींनी एक दिवस ठाम निश्चय केला की, काहीही करून मला शाळेत पाठवायचंच...  


नेहमीप्रमाणे गावात खेळत होतो. मला त्या दोघींनी खाऊ देतो म्हणून फूस लावली आणि गोड बोलून घरी आणलं. मी ही खाऊ मिळणार म्हटल्यानंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्या खुशीतच घरी आलो. सांगण्यात आलं अंगोळ केल्यावर खाऊ देणार मी खाऊच्या लोभापायी आंघोळीला तयार झालो. मला गरम पाण्याने अंगोळ घालण्यात आली. पण ती खुशी फार काळ टिकली नाही. मला फाटके असलेले पण नेटके कपडे घालण्यात आले. अन मग समजलं हे सगळं मला शाळेत जाण्यासाठी चाललंय तसा माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि मोठ मोठ्यांनी बोंब मारायला सुरुवात केली. त्या दोघी खूप समजावत होत्या पण मी ऐकत नव्हतो. त्यांना राग अनावर झाला आणि मला आग्या (एक खाज येणारी वनस्पती) लावून मला चड्डी ओली होई पर्यंत सुजवला. मी असह्य वेदना होऊन टाहो फोडला होता. अंगाची आग होईल तस तसा मी नुसता नाचत होतो. सगळ आंग गाठींनी भरलं होतं. वरून उन्हात उभं केलं होतं. पण मला वाचवायला गावातील कोणी आलं नाही. काहींनी त्या चित्त-थरारक दृश्याचा आनंद लुटला तर काहींना माझी अवस्था बघून अश्रू अनावर झाले. शेवटी नाईलाज म्हणून मला शाळेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हया सर्व नाट्यमय प्रकारानंतर मी कसा बसा हुंदके देत शांत होऊन शाळेत जाण्यास तयार झालो. त्यानंतर मला शाळेत पाठवण्यात आलं. गुरुजींनी आणि मुलांनी माझं स्वागत केलं. आणि दोन तासांच्या हजेरीनंतर मला अंगावरील होणारी खाज पाहून गुरुजींनी घरी पाठवलं. दुसऱ्या दिवसापासून सर्व मुलांप्रमाणे मी शाळेत जायला लागलो. आणि सर्वांबरोबर खेळू-बागडू व अभ्यास करू लागलो. असा हा माझा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय होता.


माझं प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत बोर्गेवाडी येथे झालं. पुढील शिक्षणासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मेंढोशी येते, पाचवी ते सातवी करता शाळेत प्रवेश घेतला. मेंढोशी आमच्या वाडीपासून साथ ते आठ किलोमीटर लांब आणि सर्व डोंगराळ भाग दाट झाडी, पाऊस वारा खूप मधेच खूप मोठा ओढा त्या ओढ्याचा उगम म्हणजे सढावाघापुर येतील उलटा धबधबा... त्या धबधब्यापासून तो ओढा खालची मेंढोशी येथे केरा नदीला मिळतो. त्या ओढ्याला खूप पाणी असतं त्यावेळी पूल नसल्यामुळे आम्हाला ओढ्यातून जावं लागे. कित्येकदा आमची दप्तर भिजत असत आम्ही तर खूप

पावसाळ्यात ओढ्याला खूप पाणी असतं. पूल नसल्यामुळे ओढ्यातून जावं लागत असे. कित्येक वेळा आम्ही व्हाऊन जाता जाता वाचलोय, पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड असतो की, ओढा ओलांडताना माणसे, जनावरे व्हाऊन गेली आहेत. त्यातूनही आम्ही जात असू आणि खूपच पाण्याचा प्रवाह वाढला तर तिथूनच मागे घरी यावं लागे. खूप पाऊस असल्यामुळे ओल्याचिंब अंगाने शाळेत जावं लगे. सगळं दप्तर भिजलेल असायचं आंगावर प्लास्टिकचा कागद हवेचा आणि पावसाचा प्रचंड प्रवाह असल्यामुळे छत्री कधी टिकायची नाही. त्यामुळे प्लास्टिक चा कागद आंगावर घ्यायचा आणि शाळेत जायचं. कधी ऊन, कधी वारा, तर कधी पाऊस बेभान पडायचा. ह्या सगळ्यावर मात करत आम्ही एवढा प्रवास करायचो...


Rate this content
Log in

More marathi story from Dinkar Pawar