बाबांनो ! तुमचे झेंडे , तुमचे
बाबांनो ! तुमचे झेंडे , तुमचे


बाबांनो ! तुमचे झेंडे , तुमचे दांडे तुम्हाला लखलाभ.
आमचे प्रश्न वेगळे ,आता तरी आम्हाला मुक्त करा
अन भरू द्या टीचभर पोटाची खळगी जगू द्या सुखाने , शोधु द्या
अंधकारमय वातावरणातून लेकरांच्या भविष्यासाठी एखादा आशेचा किरण .
नाही तरी आमचे प्रश्न आम्हालाच सोडवायचे आहेत पण तुमच्या स्वार्थासाठी
आमच्या लेकरांचा वापर करणे बंद करा. निदान लोकशाही आहे
देशात एवढं तरी किमान भासवा वारंवार का होईना .
माहित्ये आम्हाला तुमचे डाव , गनिमी कावे , पण आम्ही मजबूर म्हणून
गैर फायदा घेऊ नका , अंत पाहू नका. जातीय तेढ नष्ट करून सलोखा
कायम ठेवा बाबांनो ! नाही तर त्याची झळ तुमच्या पर्यंत पोहचणारच नाही
या भ्रमात राहू नका . लोकांना मूर्खही समजू नका . थोडी तरी जबाबदारी स्वीकारा .
नेहमी लक्षात ठेवा प्रेम दिल कि प्रेम मिळेल ... जगात तीनच गोष्टी अशा आहेत कि
त्या दिल्याने वाढतात कमी होत नाही . १. प्रेम , ज्ञान आणि मान. त्याच चुका
पुन्हा पुन्हा करू नका . अहंकार तर अजिबात बाळगू नका कारण तोच सर्वात
मोठा शत्रू असतो हे लक्षात ठेवा .
विजयाचा उन्माद बाळगू नका , ज्यांनी निवडून दिल त्यांच्यासाठी काहीतरी विधायक करा
सुवर्णसंधी चालून आलीय पुन्हा अजिबात दवडू नका .
विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा !