बाब रिटायर होतो आहे
बाब रिटायर होतो आहे


बाबा काही सांगायचे आहे तुम्हाला कुठलाही प्रवास आईपासून सुरु होऊन बाबांपाशीच येऊन थांबतो. कॅलेंडरवर एक दिवस असा येणार होता कि तेव्हा तुम्ही रिटायर होणार होते. २८ फेब्रुवारी २०१८ तुमच्यासाठी खूप जड दिवस असेल. कृषी विभाग महाराष्ट्र शासनबरोबरची ३५ वर्षांची कारकीर्द संपली असणार/आहे. ३५ वर्षाच्या कारकिर्दी मध्ये खूप अनुभवले तुम्ही पण एक शब्दाने पण कधीच आम्हाला सांगितले नाही. तुमची कारकिर्दी लिहायची चमक माज्या मोडक्या हातामध्ये नाही आहे तरी मी माझ्या अक्षरामध्ये लिहित असतो.
रोज सकाळी उठून चाललेली धावपळ, ऑफिसला वेळेवर पोचायची पळापळ हे अचानक मधेच सर्व थांबणार होते, इतकी वर्षं त्यांनी नोकरी केली आणि अचानक एके दिवशी सर्व बंद, खूप वेळ चाललेला गोंगाट एकदम बंद झाल्यावर कान कसे सुन्न होतात तसेच काही तरी आयुष्य होत असेल. रिटायरमेंटच्या दिवशी घड्याळही रिटायर होणार होते, त्यामुळे उठायची वेळ नाही अन् झोपायची वेळ नाही.
बाबांबद्दल काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारख कोणत्याच बाबाचे व्यक्तिमत्त्व नसते. तुझ्या आठवणी, तुझ्या शिकवणी, तुझ्या रागावण्याची प्रत्येक कहाणी शिकून जाते. बाबा मला तो क्षण फार आवडतो जेव्हा माझ्या सुट्यांमध्ये मला तुम्ही ऑफिसला घेऊन जायचा, कसा दिवस जायचा समजायचे नाही. खूप आठवणी आहे ज्या कधी विसरता येणार नाही. आता इतका मोठा झालो की काय देऊ बाबाला समजत नाही पण तुमच्यासाठी अजून लहानच आहे मी बाबा. म्हणून देऊ तर नाही शकत काही मी पण तुमच्याकडून घेऊ नक्कीच शकतो, घ्यायचेच झाले तर, ती जबाबदारी माझ्या अंगावर दे ज्यासाठी तुम्ही रात्रंदिवस झिजला, जमलेच द्यायला काही तर आईचे अन् तुझे उपकार दे.
कृषी विभाग आणि बाबा यांच्यातलं नातं या ओळींसारखं आहे
“मी परका म्हणून तुझ्या किनाऱ्यावर लागलो
मित्र म्हणून तुझ्या घरी राहिलो आणि
आता पाहुणा म्हणून निरोप घेत आहे”