Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Sanjay Dhangawhal

Others

2  

Sanjay Dhangawhal

Others

आयुष्य म्हणजे खेळ

आयुष्य म्हणजे खेळ

5 mins
529


असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस,आपले नशीब घेवून येतो आणि त्या नंतर तो त्याच्या नशिबाने मोठा होतो,अर्थात मोठे होण्यासाठी त्या माणसाला खुप परिश्रम,मेहनत,कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे तो मोठा होत असतो मोठं होण काही सोपं नाही खुप घाम गाळावा लागतो.काहीना वडिलोपार्जित आधार असतो म्हणून स्वतःच नशिब अजमावयाला काही जडं जात नाही,कौटुंबीक पाश्वभूमी जर बळकट असली ना तर माग यशाचा मार्ग सुकर होतो पण एखाद्याची जर परिस्थिती सुरवातीपासुनच कमकुवत आसेल किंवा कुठलाचं आधार नसेलं तर त्याला खुप मेहनत घ्यावी लागते,खुपच परिश्रम,कष्ट करावे लागतात,स्वतःच्या हिंम्मतीवर ध्येय साध्य करण्याचा त्याचा प्रयत्न असतो,मग त्यावेळी तो कोणत्याही संकटाना घाबरत नाही प्रत्येक अडचणीवर मात करतो त्याच्या यशाचा मार्ग मोकळा करुन घेतो.कष्टकरी माणसाच्या आयुष्यातला यशाचा प्रवास कितीही खडतर असला तरी तो आपले स्वप्न साकार केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

  

आयुष्यात काहितरी मिळवायच असेलक कुठेतरी यशस्वी व्हायच असेल तर आयुष्याला संघर्षाच्या मैदानावर उतरवून प्रयत्नाचा खेळ खेळलाच पाहिजे तेव्हा कुठे यश पदरात पडते,मग क्षेत्र कुठलही असो तिथे परिश्रमाशिवाय पर्याय नसतो.तिथे आपल्याला कष्ट करावेच लागतात,जो तो आपल्या परिने पाऊल टाकुन यश कसे मिळवायचे,यशस्वी कसे व्हायचे याचा अनुभव घेत असतो, सुरवातीला माणूस काही शंभर टक्के यशस्वी होत नाही,कासवाच्या गतीने चालायला लागले तर वाटेवर मार्गदर्शक खुप भेटतात ते त्यांचा अनुभव सांगुन आपल्या यशाची वाट मोकळी करून देतात कारण अनुभवाशिवाय काहीच साध्य होत नाही म्हणून सशाच्या गतीने कधीच पळु नये,आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येक माणसाला स्वतःच्या कल्पकतेचा, बुध्दीकौशल्याचा वापर करुन कसोटीवर उतरल्याशिवाय बावंन्नकसी सोन्याची पारख होत नाही तेव्हा एखादी काम करायचं म्हटल्यावर एका जागीच न थांबता चलत ऱ्हायचं प्रयत्नाच्या वाटेवर एकतरी पुढे जाण्याचा मार्ग दाखवणारा भेटतोचं आणि प्रयत्नवादी माणसाला ते काही अवघड नसते तेव्हा

*घ्यावे लागले घाव कितीही*

*तरी थांबायचे नाही*

*आयुष्याचा डाव* *खेळताना*

*मागे वळुन बघायचे नाही*


   माणसाचा जगण्याचा प्रवास काही सहज आणि सोपा नसतो खुप वेदना,यातना,दुःख सहण करून अनेक जखमा आणि नको त्या संकटाना अडीअडचणीला सामोरे जावून मगच सुखाचे दिवस बघायला मिळतात. नावारूपाला यायला अनेकांचा रोष पत्कारून मार्ग काढावा लागतो आपल्या अवतीभवती सर्वच माणसे काही चांगली नसतात दुसऱ्याच्या सुखावर मिठ चोळणारेही खुप असताता आणि दुसऱ्याचा आनंद बघून स्वतःला जाळून राख करून घेणारेही खुपच असतात.पण त्यांना एक कळत नाही एव्हडे सारे वैभव मिळवण्यासाठी किती कष्ट,किती परिश्रम, किती दिवस उपासमारी केली असते? तरीही आयुष्याचा खेळ खेळताना आपल्याला जर पुढे जायच असेल तर बाकीच्या गोष्टींचा विचार न करता अशा जळाऊ लोकांना हाताशी धरुन आपण ताठ मानेने चालत रहायचं आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर आपला तिरस्कार करणारेही आपल्यापुढे नतमस्तकं होतात,उगाच दुसऱ्याचे बोलणे मनावर घवून आपला ध्येयसिध्दीचा मार्ग विचलीत होवू द्यायचा नाही,या जगात अशी खुप माणसे आहेत की ते आपल्या सोबत राहून आपलीच निंदानालस्ती करतात आपल्या वाईटावर चितलेले असतात आहो वाईट विचारांची,वाईट प्रवूत्तीची माणसे पावलोपावली आहेत, प्रत्येक वळणावरती अशी माणसं भेटतात. अशा माणसांचे हेतू, द्रूष्टीकोन, विचार, सारेच काही वाईट असते तरी अशा विस्तवाला आपल्या सोबत ठेवायचे असते. त्यांच्या साक्षीनेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा चारचौघात दाखवायचा असतो उगाच घाबरायच कशाला आयुष्याचा खेळ खेळताना अशा वाईट जळाऊ लोकांशी युद्ध करून जो यशस्वी होतो तोच या जगात कौतुकास्पद ठरतो,


पाय ओढणारे तर खुप असतात पण आपला पाय कोणाच्या हातात येवू द्यायचा नाही आणि कोणी पाय आडवा टाकत असेल तर त्याचा पाय मोडायला घाबरायच नाही, लोकतर भल्या माणसाला जगुही देत नाही आणि मरू ही देतं नाही पण आपण आपल्या मर्जीचे मालक असतांना उगाच कुणाच्या दबावाखाली कशाला जगायचे आपण आपल्या पध्दतीने जगण्याचा आनंद घ्यायचा,आपलीच निंदानालस्ती करणाऱ्याला झुकवायच असेल तर त्याला जवळ करून प्रसंगी त्याला मदत करुन त्याला पश्चतापाच्या अग्नीत जाळायचं त्याची मान शरमेने झुकली पाहीजे.

  

आयुष्य म्हणजे चित्रपट,नायक तिथे खलनायक असणारच आहेत आणि अशा खलनायकांचा त्रास चांगल्या माणसांनाच होतोच,कारण ऐखाद्याची विरोधात बोलण्याची,बदनामी करण्याची सवय मेल्या शिवाय जात नाही तेव्हा अशी माणसे पावलोपावली असतात तेव्हा सभ्य माणुस कोणाकोणाचे तोंड बंद करेल उगाच वेड्याच्या नादी लागुन आपला शहाणपण गहाण ठेवू नये तो किधीही आपल्या शहाणपणाने शहाणा होणार नसतो कारण दोन गोष्टी हिताचे ऐकुण घ्यायला आजच्या काळात तरी कोणाची मानसिकता राहिली नाहीत,हां उपदेश देणारे तळ भरपुर असताता भेलेही ते उपदेश त्यांच्या आचरणात नसले तरी उपदेशाचा डोस देण्यात ते सर्वात पुढे असतात.   

   

आपल्याला जर लोकांच्या स्मरणात कायमचं लक्षात रहायच असेल तरं आपली कामगिरी सर्वांपेक्षा वरचड असायला हवी आपल्या कामाचा,कार्याचा ठसा उजळ असला पाहीजे तरच लोक आपल्याला नमस्कार घालतीत आपल्या सोबत असतील नाहीतर माणसाच आयुष्य मातीमोल व्हायला जराही वेळ लागत नाही,परिश्रमाने,

मेहनतीने, कष्टाने मिळवलेले वैभव केव्हाही नष्ट होवू शकते तेव्हा प्रामाणिकपणे काम करून नम्रतेने राहणाऱ्याला काहीच कमी पडतं नाही.आयुष्याचा खेळ खेळत असताना आपण नेहमीच चांगलच काम करत रहायच कारण चुकिचे काम करणाऱ्याला योग्य वाट सापडत नाही,वाट चुकली म्हणजे माणूस संपला,कारण आपण काय काम करतो याकडे जगाच लक्ष असते तुम्ही कुठलही काम करा चांगल वाईत माणसाच्या प्रत्येक हरकतीवर जगाच लक्ष असते,या जगापासुन तुम्ही काहीच लपवू शकत नाही हजार नजरा आपल्याकडे पहात असतात तेव्हा लाख प्रयत्न केले तरी लपवता येत नाही ते एकनाएक दिवस जगासमोर येतेच आपले चांगले वाईट प्रत्येकाला कळतेच तेव्हा चांगल काही करताना सीना तानके करायचे तर चुकीच काम करताना जरा सबुरीने सावध पवित्रा घेऊनच पावले टाकायला हवीत. ईथे या जगात चुकिला माफी नाहीच जो चुकला त्याला केव्हातरी शिक्षा मिळतेच त्यातुन सुटका नाहीच. तेव्हा जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले करत रहायचे.


आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेवून आपल्या ताटातला घास दुसऱ्याच्या पोटात गेल्याचा आनंद सात पिढ्याची श्रिमंती देवून जातो म्हणून चांगल काम करून आयुष्याचा खेळ करणारा माणुस कधिच मागे रहात नाही. कारण माणसाचा काहीच भरोसा देता येत नाही आपल्या सोबत असणारा माणूस बोलता बोलता जिव सोडुन देतो आता हेच बघाना करोनाने काय धुमाकूळ घातलाय तिथे कोणाचेच काही चालत नाही आजतरी जगातल्या प्रत्येक माणसाची परिस्थिती वाईट आहे प्रत्येकजन जिव मुठीत घेवून बसला आहे केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही माणसावर उपासमारीची वेळ आली आहे मरण उबंरठ्यावर आहे.आपल्याचं मस्तीत,गुर्मीत राहणारा माणूसही जमिनीवर बसायला लागला सर्वकाही एकसमान झाले आहे थोडक्यात सांगायचे झालेतर आजच्या घडीला बि एम डब्ल्यू गाडीत फिरणारा माणूस साकलवर फिरणाऱ्या माणसाच्या बरोबरीला आला आहे.


तेव्हा फक्त चांगले कर्म करत रहायचे कारण *कर्मही ईंन्सानकी सहायता कर सखता है।*


आपण गेल्यानंतर सर्वांच्या आठवणीत राहण्यासाठी चांगले बोलणे चांगले वागणे खुप महत्वाचे आहे सर्वांशी हिळूनमिळुन राहुन आपले आयुष्य आनंदात जगायचे आहे आणि आयुष्याचा खेळ खेळायच आहे.


Rate this content
Log in