“
स्पष्टता हि अनेक गोष्टींमध्ये असते , बोलण्या मध्ये , वागण्यामध्ये , व्यवहारामध्ये , शारीरिक हालचालींमध्ये इत्यादी
स्पष्टता कुठे दाखवावी आणि कुठे दाखवू नये ,याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे .आणि हे ज्याला समजलं , त्याची इतरांशी कधी वादावादी होत नाही. उदा . अ ने ब कडे एखादी नवीन गोष्ट मागितली , अ ने लगेच त्याला दिली , आणि ब ने पैशांबद्दल विचारताच , अ म्हणाला अरे पैशांचे मग बघू तू कुठे जातो आहेस कि मी कुठे जातो आत्ता तुला गरज आहेना मग तू बिनधास्त पणे वापर , यावर ब काही न म्हणता वस्तू घेतो काही दिवसांनी ब पैशाबद्दल विचारतो तर अ म्हणतो अरे दे तू रे माझी अमुक ती अपेक्षा नाही म्हणून ब त्याला आपल्या विचाराने पैसे देतो पैसे बघून अ नाराज होतो म्हणतो इतके कमी आणि मग दोघात थोडा वाद निर्माण होतो हेच जर ब ने स्पष्ट पणे त्याला सांगितलं असत कि मला किती ती नक्की किंमत सांग तसे सांगणार नसशील तर मला वस्तू नको हि जर स्पष्टता ब दाखवली असती तर वाद निर्माण झाला नसता किंवा अ ने वस्तू देते वेळी अमुक किमतीला वस्तू पडेल अशी स्पष्टता दाखवली नाही
”