“
प्रेम कसं असत ...............
.....वयाचं बंधन नाही कि जातीचं .. कारण
प्रेम निर्मळ असत !
.....परत फेड नाही कि लोभ नाही .. कारण
प्रेम व्यवहार शून्य असत !
.....मत्सर , सुड भावना तर नाहीच नाही .. कारण
प्रेम त्यागी असत !
.....शब्दात व्यक्त तर होतच नाही .. कारण
निसर्गाने दिलेले अनुभूतीचे वरदान असत !
”