“
आई म्हणजे त्या मंदिराचा उंच असणारा कळस
आई म्हणजे त्या दारातली पवित्र असणारी तुळस...
आई म्हणजे माझ्या नात्यातला मायेचा अतुट ठेवा
आई म्हणजे साक्षात भगवंतानी दिलेला सुखद मेवा...
आई म्हणजे माझ्या पहिल्या खऱ्या प्रेमाची सुरुवात
आई म्हणजे रोजच्या माझ्या जगण्याची मिळकत...
आई म्हणजे माझे विश्व व्यापून टाकणारी भावना
आई म्हणजे माझ्या यशाला मिळणारी गुरुदक्षिणा..
”