वृक्षसंवर्धन
वृक्षसंवर्धन
1 min
249
झाडे लावा झाडे जगवा
हा नारा फक्त देऊ नका,
ढासळलाय निसर्गाचा समतोल
आता तरी त्यापुढे वाका 'll 1 ll
ऑक्सिजनविना प्राण गेली
मानवा आता तरी जाग
सगळे काम बाजूला ठेवून
आता वृक्षरोपणाला लाग'll 2 'll
पर्यावरण दिनी नुसता फोटो काढून नको ,
कधी तरी झाडाला थोडं पाणी तरी घाला
झाडाचे फक्त महत्त्व सांगू नको
कधी तरी त्याला थोडा जीव तरी लावा 'll 3 'll
नाही लावलं झाड तर
प्राणवायू मिळणार नाही फुकट,
वेळ अशी आली आहे आता
तो मिळणार ही नाही विकत 'll 4 ll
नसेल लावायचं झाड
निदान तोडू तरी नको,
नसेल लावायचं झाड तर
प्राणवायूची अपेक्षाही धरू नको'll 5 ll
म्हातारपणी सगळे सोडून जातील
पण पाण्याचं ईमान ते राखेल
फळ, फूल, सावली
पोटभर पूरवेल 'll 6 ll
पर्यावरणदिन साजरा करून
एक तरी झाड लावू या,
वृक्षसंवर्धन करून सगळे
मोकळा श्वास घेऊ या ll 7 ll
