STORYMIRROR

Rajani Thakre

Others

3  

Rajani Thakre

Others

वृक्ष

वृक्ष

1 min
214

मी पर्णहीन वृक्ष

जातात पाखरे दुरुन

होते तुम्हीच साक्ष

जेव्हा येत होतो बहरुन....

माझ्या या फांदीवर

अगण्य कळ्या जन्मल्या

त्या मनमोहन कळयातुन

कित्येक कळ्या उमलल्या...

माझ्यातला गार वारा 

सुखद अनुभवला

घेवुन आनंद सारा

आज लाकडाचा सांगाडा... 

हे मानवा अजुुनही  

वेळ तुझीच आहे 

नसल्यास मी कुठेही 

जिवनाची झिजंं आहे... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन