STORYMIRROR

Subhash Argade

Others

3  

Subhash Argade

Others

विविध ऋतु

विविध ऋतु

1 min
1.0K

पृथ्वीवरी वसंत, ग्रीष्म,

वर्षा अन् शरद. 

हेमंत, शिशिर ऋतुंचा,

निर्माता वरद. 


हवे ते दिले सारे, 

निसर्ग हा बहरला. 

ऋतुने कसा रंगबेरंगी,

फुलांचा पिसारा फुलवला. 


एकाहूनी सरस एक,

कसा लपंडाव खेळूनी.

फुलविले नद्यांनी,

सजविली धरती ऋतुंनी.


ऋतु बदलती ,

धरतीचे रंग बदलती.

ऋतूंच्या खेळात आम्ही,

कसे न्हाऊन निघती.


ऋतु देऊन जाते, 

आठवणी नव्या.

जीवनाच्या वाटचालीत,

साऱ्यांना त्या हव्या.


(शब्दार्थ:- वरद - अग्निदेवता, सूर्य. हवे - पाहिजे.)


Rate this content
Log in

More marathi poem from Subhash Argade