STORYMIRROR

Vandana Main

Others

3  

Vandana Main

Others

विठ्ठला पांडुरंगा

विठ्ठला पांडुरंगा

1 min
307

विठ्ठला पांडुरंगा,

दुरून मस्तक तुझ्या चरणी ठेवीला

डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला

दरवर्षी आषाढीला दूमदूमते पंढरी

तुझ्या दर्शनी विठूराया

पंढरी जमते भक्तांची वारी

तुळशी गळामाळ घालूनी

कमरेवरी हाथ ठेवूनी विटेवरी

उभी माझ्या सावळ्या विठूची स्वारी

जगावर पडीले संकट भारी

तूच आम्हा लेकरांना तारी

विठ्ठला पांडुरंगा,

दूरूनी मस्तक तूझ्या चरणी ठेवीला

डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला.  


Rate this content
Log in