विरह
विरह
1 min
221
कधी जमले ना आसवांना
रिते व्हावे डोळ्यातून
ना उघडले मन कधी
डोकावे ते झरोक्यातून...
ओढ आसवांची विसावली पापणी
आर्त हृदयाची ओठीच मावळली
. हुंदक्याच्या गजराने कंठ झाला मुका
दिन प्रहरी कुठ्ठ रात्र हीअवतरली...
वेदना अन् विरहाचे
नाते जन्मजन्मांतरीचे
गुदमरलेला हा जीव
कसे किती सोसायाचे..
