विनंती
विनंती
1 min
195
आई मला वाचव
या आजच्या आधुनिक जगापासुन
जिथे होतेय रोज लूटमार
माझ्या संवेदनशील मनाची
आई मला वाचव
या अंधश्रद्धेच्या जाळ्यातुन
जिथे होतेय रोज हत्या
अनेक निष्पाप स्त्री बीजांची
आई मला वाचव
या प्रसारमाध्यमांच्या हूंदक्यातुन
जिथे रोज टीआरपी वाढावा म्हणुन
उडवले जाताय आक्षेप्राय विधानाचे शिंतोडे
आई मला वाचव
या विकृत्त समाज कंटकांपासून
जिथे घेतला जातोय नाहक बळी
आमच्या बाह्य सौंदर्याला भुलून
आई मला वाचव
या भ्रष्ट राजनितिपासुन
जिथे रोज होतोय अन्याय
शुल्लक द्रव्यहव्यासापोटी
आई मला वाचव
या कट्टर देशद्रोह्यापासुन
जिथे ठेवला जातोय गहाण
स्वत:चा व देशाचा स्वाभिमान
