STORYMIRROR

world of composition

Others

3  

world of composition

Others

विजयादशमी....

विजयादशमी....

1 min
428

प्रथमेस शैलपुत्री,द्वितीयेस ब्रम्हचारिणी 

माता नवदुर्गा विराजतात घटस्थापनेच्या क्षणी....


तृतीयेस चंद्रघंटा,चतुर्थीस कूष्मांडा 

मातेस आलंकार सारे श्रुंगारुणी सुरु होते ही आराधना....


पंचमीस स्कंन्दमाता,षष्ठीस कात्यायनी 

शौर्य-करुणेची,संगोपनाची शोभिनी.....


सप्तमीस कालरात्रि,अष्टमीस महागौरी 

काळाची ही साक्षी,ज्ञान-शुद्धता प्रदायनी.... 


नवमीस सिद्धिदात्री करे सर्वांची इच्छापूर्ती

या नवरात्रीच्या समुहातुन नवदुर्गांची महाआरती....


क्षण हा मंगलमय साडे-तीन मुहर्तांपैकी एक

विजयदशमी नाव या सणाचे दसरा ही म्हणतात अनेक....


राग -द्वेष,लोभ मत्सर याचे विसर्जन करुनी

निर्मळ-तेजस्वी अशा विचारांनी करुया साजरी ही विजयादशमी 


स्त्री वरील अन्याय-अत्याचारांचा नाश करुनी

स्त्रीशक्तीचा आदर करुनी करुया प्रत्येक स्त्रीला तेजस्विनी.....


विवेक-बुध्दी,धाडस-निडरता हे गुण अंगीकारुनी 

स्त्रीशक्तीचे अस्तित्व झळकवू प्रत्येक मनी......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from world of composition