STORYMIRROR

Sachin kisan Korde

Others

3  

Sachin kisan Korde

Others

वेडा लेखक

वेडा लेखक

1 min
25

हे कृष्णा हे मुरलीधरा,

प्रेमाची परिभाषा शिकवणारा तूच होतास ना रे...

तू जे बीज रोवले होते,

ते खरंच अप्रतिम होते रे...

त्यात माझी काही शंका नाही,

मग आत्ताच प्रेम असं का रे...

दोन दिवसाचं , दोन घडीचं,

कोणत्याही क्षणी संपून जाणारं...

कधी म्हणायचं मी तुझाच / तुझीच आहे,

आणि दुसऱ्या क्षणी म्हणायचं,

आता नाही राहू शकत मी तुझ्या सोबत,

हे असतं का रे प्रेम...

कधी समोरच्या व्यक्तीला,

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतच्या,

स्वप्नांत रंगवून द्यायचं...

आणि काही क्षणात आपणच ते स्वप्नं,

पायाखाली चिरडून निघून जायचं...

हे असतं का रे प्रेम...

कधी म्हणायचं मी तुझ्या शिवाय,

राहू शकत नाही...

तू मला हवा / हवी आहे ,

आणि दुसऱ्या क्षणी तुझी गरज नाही,

असं म्हणून सोडून जायचं,

त्याला/तिला एकट्याला/एकटीला तगमगत मारण्यासाठी,

हे असतं का रे प्रेम...

साधा माणूस लेखक नसतो बनत हो,

आधी तो या प्रेमाच्या मोहमायेत सापडतो,

नंतर तो प्रेमात वेडा होत जातो...

समोरची व्यक्ती सोडून गेली की,

तो स्वतः सोबतच गप्पा मारायला लागतो...

त्याचा शेवटचा पर्याय असतो तो,

मनात गुदमरत असलेल्या,

भावना, वेदना शब्दाद्वारे उतरवण्याचा...

म्हणून नंतर एक वेडा लेखक बनतो...

लेखक कधी वेडा नसतो हो,

वेडा लेखक असतो...



Rate this content
Log in

More marathi poem from Sachin kisan Korde