वध पूतनेचा
वध पूतनेचा
1 min
11.4K
कान्हा वाढतोय नंदाच्या घरी
ऐकोन धडकी भरली कंसाच्या उरी
प्राण हरण्या चिमुकल्या श्रीहरीचे
धाडले त्याने पूतनेस सत्वरीने
रूप घेऊन धाराऊचे
पुतना पुसे यशोदेस प्रिय वचने
घेते बाळास पदराखाली
होईल घनश्याम तेणे बलशाली
हर्ष झाला अति यशोदेस
परि पाप बहुत पूतनेच्या मनात
बाहुत घेता मायावी राक्षसीणे
मुकुंदाने ओळखिले डाव चातुर्याने
विष प्राशना बाळास पुतना होई सज्ज
तो भयंकर किंकाळी पसरली दहादिश
पितळ उघड झाले पूतनेचे
मूळ रूपात येता अति वेदनेने
महाकाय देह तो राक्षसी
निपचित पडला होता भूवरी
श्यामसुंदर खेळात दंग परि करीत स्मित
पाहुनी तो पराक्रम अवघी नंदनगरी चकित
