तूच तू
तूच तू
1 min
174
जिवन वेली वरची सुगंध तू,
जाई जुई तूच तू....
आयुष्याच्या पटलावर उच्च तू,
आशा अपेक्षा तूच तू....
नभातील माझ्या अश्रू तू,
भावनांचा कल्लोळ तूच तू....
संगीतातील माझ्या राग तू,
सुर अन् ताल तूच तू....
जिवनरुपी खेळातील खेळाडू तू,
हार अन् जित तूच तू....
संसारात आधार तू,
सावली अन् छाव तूच तू....
लिखाणातील माझ्या काव्य तू,
शब्द न शब्द तूच तू....
सोडुन गेली तेव्हा कळले,
प्रेमाच्या पोर्णिमेबरोबर,
विरहाची अमवस्यादेखील तूच तू...
