तुम्ही काय करता?
तुम्ही काय करता?
1 min
476
तुम्ही काय करता
जेव्हा तुम्हाला आठवण येते
आपल्या घरची
तुम्ही काय करता
जेव्हा तुम्हाला काही पण कळत नाही?
की तुम्ही आहात कोण
की तुमचा आहे कोण
मी काही पण करते
काही पण...
जेव्हा मला आठवण येते
कधी जास्तीचे पाणी पिऊन घेते
तर कधी इकडे तिकडे फिरते
कधी काही नाही म्हणत
तर कधी काही पण म्हणते
घराची आठवण काही तरी असते..
पण असते अगदी खरी
कधी तुम्हाला आठवण दिलऔते मोगरे ची
तर कधी पांढरा तूपची
मग मी पण त्याच दिवशी
आठवण ठेवते घरची
आणखीन घालते कई तरी पांढरा
हे सगळे मी करते
जेव्हा मला आठवण येते
माझे घरची
तुम्ही काय करता
जेव्हा तुम्हाला आठवण येते
आपल्या घरची. .............
