STORYMIRROR

Maroti Mane

Others

3  

Maroti Mane

Others

तुला आठवतंय ना...?

तुला आठवतंय ना...?

1 min
247

तुला आठवतंय ना...? 

ते पौर्णिमेच्या रात्रीचं

टिपूर चांदणं... 

आणि तुटणा-या

ता-याकडे एकमेकांना 

मागणं...! 


स्वतःचा हात मानेखाली

घेवून झोपल्यावर... 

तुला आठवण येते का

माझ्या मांडीच्या उशीची..? 


आणखी काय काय आठवतंय...? 

रात्रभर एकमेकांशी फोनवर

केलेल्या गप्पा... 

तू माझी वाट पाहून थकल्यावर

मी अचानक मागून येऊन

तुला दिलेला धप्पा... 

एकमेकांच्या हातात हात घालून

फिरलेला नदीचा किनारा... 

जगाच्या नजरेला चोरून

एकमेकांना केलेला इशारा... 

वर्गातल्या फळ्यावर बदामात

काढलेलं आपल्या दोघांचं नाव... 

आणि आपण स्वप्नात वसवलेलं

आपल्या प्रेमाचं गाव... 

शेवटी अचानक तुझ्या लग्नाची

मला मिळालेली पत्रीका... 

आणि मी तुझ्या डोक्यावर

टाकलेल्या अक्षता... 


आठवतंय ना...? 

सगळं-सगळं आठव

पण त्याच्यासोबत

घेतलेले सात जन्माचे

सात फेरे विसरू

नकोस कधीही...!! 


Rate this content
Log in