तुझा मी
तुझा मी
1 min
381
मी तुझ्यात रमत गेलो
नकळत तुझाच होत गेलो
माझं तुझं, तुझं माझं
कधी संपलं कळलंच नाही,
तुझं माझं आणि माझं तुझं,
कधी झालं कळलंच नाही।।
मी तुझ्यात आणि तू माझ्यात
कधी आलो कळलंच नाही,
हे सर्व नव्याने झाले ,
की जुनेच नाते उमजत गेले,
नकळत हात हातात आपुले,
कधी आले कळलंच नाही।।
न भेटता भेटत गेलो,
दुरूनच एकमेकांना न्याहाळत गेलो,
नकळत जीव जडत गेला,
ओढ लागली कळलंच नाही,
माझ्या मनाचा तुझ्या मनाला
स्पर्श झाला कळलंच नाही।।
मी माझा, तुझा झालो
का कधी कसा , कळलंच नाही,
माझा मला मीच होतो,
माझ्यात मी संपत होतो,
तू भेटली , मी भेटलो,
कसे कुणाला कळलंच नाही।।।
