तु अभिमान आहेस सर्व जगाचा...
तु अभिमान आहेस सर्व जगाचा...
गर्व आहे नारी तुझ्या अस्तित्वाचा,
तु अभिमान आहेस सर्व जगाचा...
मुलगी, आई, बहिण
अश्या नाना तुझ्या भुमिका,
शत्रूच्या विनाशासाठी
कधी काली, कधी चंडीका,
असे मुजरा तुला मानाचा...
तु अभिमान आहेस सर्व जगाचा.....
तुझ्या बलिदानामुळेच
उभ हे सार जग असे,
तुझ्या विना हिरवे रान ही
ओसाड वाळवंट भासे,
तु आधारस्तंभ असे या विश्वाचा
तु अभिमान आहेस सर्व जगाचा.....
सौंदर्यापुढे तुझ्या
फिका पडे तो शृंगार,
कष्टाच्या घामाचे दवबिंदू
शोभुन दिसे मुखावर,
तु भासे जणु चंद्र पौर्णिमेचा
तु अभिमान आहेस सर्व जगाचा.....
वेदनांनीही लाजावे
अशी तुझी सहनशिलता,
दुःखालाही विसरावे
अशी तुझी ममता,
तु असे मौल्यवान खजिना मातृत्वाचा
तु अभिमानान आहेस सर्व जगाचा....
स्वतः जळुन इतरांना
प्रकाश देणारी ज्योत तु अखंड,
अनन्ययाचा नाश करण्या,
अंगी संचारे तुफानी वादळ,
करुया जागर स्त्री-शक्तीचा
तु अभिमान आहेस सर्व जगाचा...
