तरी तुझे प्रेम नाही कळाले कोणाला
तरी तुझे प्रेम नाही कळाले कोणाला
1 min
11.8K
आपल्या भुकेसाठी केली नासाडी
बुद्धिजीवाची लायकी कळाली
पण तु केली विनवणीची युक्ति
खुप आहे तुझी सहनशक्ति
समाज धर्म जात बनवले
एका जिवाचे केले शंभर तुकडे
पण तु नाही केले भेद जिवाचे
आहे का कोण तुझ्यासारख्या मोठ्या मनाचे
लाज सोडूनी केले प्रकृतीचे नाश
तरी नाही त्याला जाणिव हमखास
तु का नाही सोडले प्राण
जेव्हा आत्याचाराचे सोडले तुझ्यावर बाण
विपरीत ज्ञानाचा कोंभ फुटला
तरी नाही कळाले बोध बुद्धीजिवाला
आता तुझा संयम सुटला
तरी तुझे प्रेम नाही कळाले कोणाला
