तीळे
तीळे
1 min
249
आनंदाचे क्षण
माझ्या घरा आले
काय सांगू गड्यानो
मला तीळे की हो झाले..
तीळयाचा बाप म्हणून
नांव गांवभर झाले
फोटोसहीत सारे
वर्तमानपत्रात आले
नशीबवान म्हणून
काहींनी कौतुक केले
पहिल्याच झटक्यात
तीळे कसे रे झाले ?
जुळेवालेही आश्चयाने
पहात की हो राहिले
आमच्या पेक्षा तूच
खरे मर्दवान झाले
ब्रह्म विष्णू महेश
घरा जन्मा आले
सारे कुटूंबच मग
भक्तीरसात न्हाहले
