ती स्त्री आहे
ती स्त्री आहे
1 min
287
ती स्त्री आहे
तिच्या विचारांना शेवट नाही,
तिच्या धैर्याला शेवट नाही,
तिच्या शक्तीला शेवट नाही,
आणि तिच्या जीवनातल्या समस्यांना पण शेवट नाही.
म्हणून ती उभी आहे हातात दिवा घेऊन प्रत्येक् समस्यांना मात द्यायला.
तिच्या हातात असलेल्या दिव्यालापण वाऱ्यापासून विझण्याची भीती नाही कारण त्या दिव्यालापण माहित आहे की तो एका स्त्री च्या हातात आहे.
आणि स्त्री वाऱ्याला फक्त आपल्या पाच बोटांनी अडवू शकते.
फक्त पाच बोटांनी ती वाऱ्याचा सामना करू शकते तर ती संपूर्ण देहाने आणि प्रचंड धैर्याने या अख्ख्या जगाचा पण सामना करू शकते.
कारण ती स्त्री आहे.
