ती बदललीय...
ती बदललीय...
1 min
557
तिच्या साडीची जागा, फक्त जीन्सने घेतलीय…
पण अजूनही तिची, तारेवरची कसरत कुठे संपलीय?
फक्त तिच्या मंगळसुत्राची, लांबी तेवढी बदललीय…
पण अजूनही तिच्यावरची, जबाबदारी कुठे कमी झालीय?
कपाळावरच्या कुंकुवाला, टिकली पर्याय झालीय…
पण अजूनही तिच्या हक्काची, लढाई कुठे संपलीय?
हातातल्या हिरव्या चुड्याची जागा, फक्त एका बांगडीने घेतलीय…
पण अजूनही त्या हातांची ओढाताण कुठे कमी झालीय?
पायातील पैंजण आता, फक्त बेडी नाही राहिलीय…
पण अजूनही त्या पायांची धावपळ कुठे संपलीय?
उंबरठा ओलांडून ती फक्त घराबाहेर पडलीय...
पण अजूनही ती पूर्णपणे सुरक्षित कुठे झालीय?
राहणीमान बदललंय फक्त तिचं ती नाही बदललीय…
पिंजऱ्यात कैद असलेल्या तिने फक्त उडण्याची हिंमत दाखवलीय...
