Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Atul Bhave

Others

2.0  

Atul Bhave

Others

थंडावता किलबिलाट

थंडावता किलबिलाट

1 min
158


पुन:श्च उगवणार नाही अशी प्रसन्न प्रभा,

अविरत कष्टन वेचलास जरी जन्म उभा ||धृ|| 


घटणाऱ्या अंधारी, 

फोफावल्या प्रकाशी,

हरित वृक्षाग्रापाशी,

भरली विराट खगांची सभा ||१|| 


रोडावली उपस्थिती,

दवाच्या पर्जन्याभासी,

चुळबूळ घरट्यापाशी,

ज्याचा त्याचा नियोजीत सभा ||२||


प्रभात ही ऋतुराजाची,

तरीही संख्या घटणारी, 

अनंताची उणीव ही, 

मोजकेच प्रजातीदर्शन दिनआरंभा ||3|| 


विरळणारी वनराई, 

जल, भक्ष, निवारा नाही,

तीक्ष्ण नजर पारध्याची,

नाही निर्भय जगण्याची शाश्वतता ||४||


सरत्या दिवसा बरोबरी, 

घटती अनंत प्रजाती,

बालकांच्या नातवंडासी,

निव्वळ चित्र,माहिती नि सापळ्यांची मुभा ||५||


Rate this content
Log in