STORYMIRROR

shripad Inamdar

Others

4  

shripad Inamdar

Others

तड

तड

1 min
343

दोस्ता जरा जपून,दोस्ता जरा जपून,

बसलाय गडी बघ,दारातच टपून!


उचलू नको पिशवी, भाजी आणू नको,

फळ,दही दूध काहिबी नको!

बिघडत नाही काइ दिवस, चहा पी कोरा,

नाहीतर लेमन टी, कर साजरा!!


आईस्क्रीम मिल्क शेकचं नाव नको काढू,

सूप अन काढ्याने,ताकद दे वाढू!


बोलवू नकोस कुणाला,जाऊ नको कुटं,

नाहीतर बोलवून, आणशील संकटं!


दुबईचा मुलगा, अन लंडनचा जावई,

आताच्या घडीला कामाचे न्हाई! 


बाजूवाला शेजारी,आणि शेजारीण,

तोच तुझा भाऊ अन तीच तुझी बहीण!


त्यांच्याशी बोल, त्यांना धरून ठेव,

तेच होतील मायबाप, तेच होतील देव!!!


माणुसकीने जग अन,धीराने लढ,

दीस काय रहाणार न्हाईत,

लागलं त्याची तड!

लागलं त्याची तड!!!


Rate this content
Log in

More marathi poem from shripad Inamdar

तड

तड

1 min read