सुरूवात नव्या आयुष्याची
सुरूवात नव्या आयुष्याची

ही धुक्याची वाट सारत मागे,केली सुरुवात नव्या आयुष्याची.
सांग नशिबा देशील साथ ,का देशील पुन्हा शिदोरी दुःखाची.
साथ सोडली तूने ,म्हणून सोडली साथ परिजनांनी.
म्हणून धरला वेगळा रस्ता एकत्र आलेल्या ह्रदयांनी.
ही धुक्याची वाट सारत मागे,केली सुरुवात नव्या आयुष्याची.
सांग नशिबा देशील साथ ,का देशील पुन्हा शिदोरी दुःखाची.
साथ सोडली सगळ्यांनी ,म्हणून रडत राहिलो एकटाच मी.
ओघाळत अश्रू,रमत राहिलो जुन्या आठवणीत मी.
ही धुक्याची वाट सारत मागे, केली सुरुवात नव्या आयुष्याची.
सांग नशिबा देशील साथ, का देशील पुन्हा शिदोरी दुःखाची.
मग देत धडा आयुष्याचा, आला एक नवा साथी.
पेटवल्या परत त्याने पणती समान आयुष्याची ज्योती.
ही धुक्याची वाट सारत मागे,केली सुरुवात नव्या आयुष्याची.
सांग नशिबा देशील साथ ,का देशील पुन्हा शिदोरी दुःखाची.
जोरावर अनुभवाच्या , नव्या जोमाने सुरू करतोय ही नवी कहानी