सुख माझे चोरीले
सुख माझे चोरीले
सुख माझे चोरीले..सुख माझे चोरीले..
तसा आरोप माझा कोणावरी नाही..
पण त्या दुःखाला पाहिले..सुख माझे चोरीले....|
तर किती दिवसाने, हसू नांदल होत..
गोड गोड बोलून त्याने,काम साधलं होत..
असेही होईल कधी ना वाटले....सुख माझे चोरीले..|
अन्यायाला सोसूनी,दोन हात मी केले..
बळी गेले ते माझ्या,रक्ताचे सगेसोयरे..
मी एकटा,कोण माझ्या सोबत ना राहिले..
सुख माझे चोरीले..|
भक्तीने देवाच्या चरणी, गाऱ्हाणं मी ठेवलं..
ऐन सराई शिवार,दुष्काळी नजरे पडलं..
का कोणी कष्टाच्या घासावर रोष ठेविला..
सुख माझे चोरीले..|
कोणी फास लाविला,माझ्या यशाच्या पायांना..
का कोणी खेचून आणला,मला पहिल्या पायरीला..
मी तुझ्या पुढे राहिलो,हे माझे का चुकले..
सुख माझे चोरीले..|
काल कोणी इथे होता,ठसा त्याने सांडला
संस्कृतीचा प्रदेश माझा,येण्याने बाटला
साधा सरळ,एक भांग असा असेल ना वाटले..
सुख माझे चोरीले|
कित्येक हात दान करुनी, गरिबांस ना पोहचले
एका रकमेत सामावले तुम्ही,जे मी सोसले..
प्रसिध्दीने माणुसकीला तडा गेला,हे आज बोचले..
सुख माझे चोरीले|
जीवन म्हणजे ,सुख दुःखांचा खेळ..
असे चक्र जे कोणा नाही चुकले..
सुख असे कधी,सहज पदरी ना पडले..
सुख माझे चोरीले..|
