सत्य जीवनातले
सत्य जीवनातले
1 min
189
बोल अनुभवाचे मला मिळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।धृ।।
धनसंपत्ती होती जेव्हा माझ्या घरी
आप्तजन सारे चिटकत मोहळा परी
संपताच धन, मला सोडून पळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।१।।
कधी बोलत नव्हते लोकं मला मा घारी
मला पाहताच आता सारे चुघल्या करी
मी उपाशीच असता सारे गिळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।२।।
पत्नी मुलांचं लक्ष फक्त पैशावरी
घरी येताचं पत्नी पगार विचारी
पैसे दिले नसतां तोंड वळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।३।।
दुसऱ्यासाठी मी नेहमीचं पुढेअसे
माझ्यासाठी कुणालाच वेळं नसे
प्रकृती ढासाळता, माझी पळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।४।।
शिक्षण देऊन नोकरीला लावले मुला
मोठे झाल्यावर ते विसरून गेले मला
पैशामागे आता सारे पळू लागले
सत्य जीवनातले मला कळू लागले।।५।।
