STORYMIRROR

Asmita Deshpande

Others

4  

Asmita Deshpande

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
420

कर्तव्यावरी निष्ठाभारी 

 एका हाती पाळण्याची दोरी 

  तिची न कोठे तुलना होय

   अन्नपुर्णा तीच खरी.......


 दुसऱ्या हाती नाते सांभाळी 

  स्वयंपाक पाणी भाजी कपडे

   हवे-नको साऱ्यांचे पाहती 

   प्रसन्न सदा ठेवनि रुपडे.....


 अष्टभुजा नारायणी

  अस्तित्व तुझे सिद्ध करी 

   जिद्द बाळगून मोठी उरी

    रूप नारीचे धन्वंतरी ...... 


 घरादाराचा घालून मेळ

  ऑफिसची सांभाळी वेळ

   कितीतरी तो ताळमेळ 

    कसरतीचा सारा खेळ.....


 ऑफिसाचा वर्कलोड 

  संध्याकाळी घरची ओढ

   किती ही शिनलीस तरी 

   शब्द अंतरीतून येती गोड


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Asmita Deshpande