स्त्री जिवन प्रवासाचा संघर्ष.....
स्त्री जिवन प्रवासाचा संघर्ष.....
फुलांचा सुगधं घेऊन दरवळतेस छान,
साडी खुलवते तुझी देह बोली खास,
वाणीत तुझ्या आपुलकीचा ओलावा
शब्द शब्द पारखुन बोलन्यात तुझ्या ग गोडवा....
हसऱ्या चेहऱ्या मागे, मुखवटे फार, जिद्दी स्वभाव तुझा,
कष्ट करण्याची ताकत तुझ्यात,
वेळेनुसार कठोर निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात...
सासर अन माहेरचे पारडे तुझ्या हाती..
दोन्ही बाजुत समतोल साधण्याची कला तुझ्या अंगी....
देताना दोन्ही बाजुला भर भरून देतेस,
घेताना मात्र जे मिळाले त्यातच सुखावतेस...
संसारचा गाडा ओढताना घरातील कमावता पुरुष होतेस,
चीड चीड करणारा, रागावणारा,तर हळूच
पाठीवर मायेन हात फिरवून शाबासकी देणारा,
बाप असतेस...
कधी मुलांत मूल होतेस,
मायेचं पांघरून असतेस,
जिवनातील उतार चढाव
मांडताना थकतेस....
थकवा सारून बाजूला पुन्हा नव्याने जगतेस
चेहऱ्यावरील हास्य नव्याने फुलवतेस...
