सरत्या वर्षाला निरोप
सरत्या वर्षाला निरोप
1 min
214
पुन्हा एकदा चाहूल लागली
गत वर्ष निरोप घटिका भरली
शिकवलेस येथे भरपूर काही
कित्येक क्षणांची ती साक्ष राही
मनात असो किंवा नसो तरी
निरोप द्यायचा ही रीत खरी
येणारे वर्ष असावे ते भरजरी
आनंदाच्या ओसांडाव्या लहरी
मिटाव्यात कटू त्या कुरबुरी
स्वच्छंदी जीवन थोडी मस्करी
भुकेल्या मिळो हक्काची भाकरी
स्थैर्य प्राप्ती ती नोकरी चाकरी
निरोप घेताना काय मागावे तुज
हलकेसे माझे तुजसवे हितगुज
मनात माझ्या ठसले तुच अजून
घ्यावा निरोप येतय नववर्ष सजून
संपावी सगळी जी आरिष्ट इथे
भय भिती न वाटावी मनास जिथे
सागरासंगे सरीता जशी खेळ खेळे
गत वर्ष नववर्ष पर्वणीचे भरू देत मेळे
