Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sainath Morye

Others

4.6  

Sainath Morye

Others

समज

समज

2 mins
114


समज असे सर्वांसी, येथे कोणी सुटेना

मंथन झाल्या विना आता, प्रश्न काही मिटेना


शोधिता उत्तरे मन, शोधत असे बहाणे

कर्तव्यपूर्तीचे जीवनी, अर्धवट घेई उखाणे


वर्तमान आनंदाची, चिंता करीत असे भंग

प्रत्येक शहाणा येथे, शोधी दुसऱ्याचे व्यंग


डिवचण्याचा व्यंगासी, नकोसा येथे अट्टाहास

दुःख झाकुनि स्वतःची, शोधी दुसऱ्याची खास


अर्थ शोधण्यासी सर्व्याचा, वेळ येथे पडे अपुरा

शिकवणीत असता समजुतीच्या, गेला असे वाया सारा


वेळ बनुनी काळ आता, समोर उभा हा राहिला

समजून चुकता आता, अंतीम क्षणच हा पाहिला


पाहता अंतिम क्षणी असे, प्रश्न करीत झाले मन

असंख्य विचारांनी आता, घातले येथे थैमान


उभ्या आयुष्यात आपुल्या, काय-कसे ते कमविले

सुख भौतिक भोगण्यात, खूप मन मात्र हे रमविले


रमवता मनवता मन हे, आयुष्य संपुनि असे जाई

आयुष्यात ह्या जीवनाचा, अर्थ न समजुनी येई


मना मनातील अंतर येथे, नकळतपणे वाढत गेले

गुपचूप मोठ्या आवाजात, सं-वाद होऊ लागले


समजण्यासही अपुरी अशी ,उरली आता येथे वेळ

कमजोर अश्या समजुतीने, बांधली नात्यांची नाळ


न ते नक्कीच केले, करायचे ते राहुनी गेले

समजुतीच्या अभावी बहुतेक, येथे जन्मले आणि मे....


म्हणुनी विनवितो ऎक जरा, नीट  पणे  हे विनवणे

न शहाणा होता आता, बदल जीवनी असे वागणे 


मधूनच जी ऐकू येई, ऐक मनाची ती साज

माणूस म्हणुनी जगताना, वाढव जीवनी समज


Rate this content
Log in

More marathi poem from Sainath Morye