STORYMIRROR

Abhay Nawathe

Others

3  

Abhay Nawathe

Others

समाधान

समाधान

1 min
301

आज पुन्हा स्मित तयार असेल

तू ये घरी 


वाळा घातलेल्या माठातलं पाणी,

वेलची घातलेला चहा आणि

खायला तुझ्या आवडीच घरचं स्नॅक्स.


तू ये आवरलेलं घर उसकायला,

भुकेची डरकाळी फोडायला.

सकाळ पासून अस्तित्व टिकवलेली रांगोळी चुकून मोडायला,


तुझ्या ओठांवरचं मिसरूड,

चेहऱ्यावरचा करता भाव,

ऑफिस मधल्या प्रश्नांची चोख उत्तर शोधणारी नजर,

सगळं सगळं बघणार आहे मी आज, अगदी रोज सारखं.


ते ऑफिस च्या राजकारणा वरचं सुस्काऱ्या सोडणं,

मित्रांच्या मूर्ख पणा वर शिव्या देणं,

मैत्रिणींच्या किस्यांवर हशं उडवण,

सगळं करूया.


बाहेर जाणार असशील तर अडवणार नाही ,

अरे वय आहे तुझं. पण, "जप" बाबा.

माझी झोप मोड होऊ नये म्हणून,

तू बाहेरून कितीही कुलुपं लावून पसार झालास ना

तरी तू नजरेला दिसल्या शिवाय, काळजीला काही कुलूप लागायचं नाही.


तू मोठा झालाय..

आता तुला कर्ता करायचंय !

यांची जागा घ्यायला नाही म्हणणार 

पण तुझ्या बाबांचं घर,

तुला 'तुझं' करायचंय!


तुझी आई म्हणून तुझ्याशी बोलतांना, 

ह्यांची बायको असल्याचं अधिक जाणवतं आता.


'त्यांचं नसणं' आणि 'तुझं असणं'

या मधे उभे आहे मी.

आठवणीत येणारे विरहाचे अश्रू 

तुझं 'मोठं' होणं बघून,

कधी सुखावून जातात कळतही नाही.

 

वठलेल्या झाडाला जेव्हा त्याचंच बीज, 

नकळत सावली द्यायला लागतं ना,

तेव्हा 'बीज' रोवल्याचं समाधान मिळतं,

कोलमडलेल्या झाडाला आणि मातीलाही


Rate this content
Log in

More marathi poem from Abhay Nawathe