श्वास माझा तू गं आई श्वास माझा
श्वास माझा तू गं आई श्वास माझा
1 min
165
तूच गं माऊली तूच गं सावली प्रेमाचा सागर तू
जीवना दिला आकार माझ्या साई माझा गं तू
जननी जन्मदात्री माझा प्रकाश ही तू
तूच माझा गुरू आणि ईश्वर ही तू
श्वास माझा तू गं आई श्वास माझा तू .....
सोशिल्यास वेदना तू मोडलीस स्वप्ने सारी
दुःखाच्या काळात माझा आधार तू
अमृताचा गोडवा तू आयुष्याची सुरवात
माझ्या जीवनी सुखाची आस तूच तू....
श्वास माझा तू गं आई श्वास माझा तू.....
आत्मा अन ईश्वराची तू मिश्रता
त्रिदेव ही तुला पूजिती ही जन्मगाथा
आई तुझ्या भेटीला जीव कासावीस होई
तूच गं माऊली तूच गं सावली प्रेमाचा सागर तू
जीवना दिला आकार माझ्या साई माझा गं तू
जननी जन्मदात्री माझा प्रकाश ही तू
तूच माझा गुरू आणि ईश्वर ही तू
श्वास माझा तू गं आई श्वास माझा तू .....
