STORYMIRROR

Sangita Birajdar

Others

3  

Sangita Birajdar

Others

शुभ्र रंग

शुभ्र रंग

1 min
201

शुभ्र रंग कलाप्रिय असतो 

फुलांच्या रंगात शोभून दिसतो 

शांत व सरल भाषा शिकवतो 

सकल सृष्टीला व्यापून टाकतो ।।१।।


श्वेत रंग नितळ मनाचा 

निर्मळ मैत्रीचा सौंदर्य वाढविणारा 

निरागस भाव नयनांनी सांगणारा 

नि:स्वार्थ नात्यांना जपणारा।।२।।


शुभ्र रंगाने हृदयाची शुद्धता 

निर्दोष प्रेम नंदनवनी बहरला 

सात्विक प्रेम म्हणजे राधेकृष्णा 

प्रेमात ज्यांनी आत्मसमर्पण केला।।३।।


'प्रकाशफूल' सफेद रंगाचा 

रंगहीन रंगात रंगलेला 

तेजोमय आरोग्य देणारा 

तिमीरातून तेजाकडे नेणारा।।४।।


झेंड्यातला रंग अस्मितेचा 

त्याग देशसेवा सत्यधर्माचा 

सर्वधर्मसमभाव धारणाचा 

सत्यमेव जयते। रुजवणारा।।५।।


रंग पांढरा हलका फुलका 

भेदाचा बुरखा भेदणारा 

समता,सुसंस्कार जपणारा 

व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व खुलवणारा।।६।।


शांत,श्वेत पद्मासना मूर्ती 

शारदा स्तवनाने मिळे कीर्ती 

यशो पताका फडके गगनी

असाध्य ते साध्य करे देवी।।७।।


अनंत काळच्या स्मृतीचे प्रतिक 

श्वेतपुष्पाने शिवशक्ती परिलक्षित

भक्तीचे भाव बनले सात्विक 

सत्य, शिव, सुंदर रूप झाले वैश्विक।।८।।


सकारात्मकतेच्या गोष्टी रंगल्या 

सुखी जीवनाचा पाया रचला 

पूर्ण करा भगवंता अंतरीची इच्छा 

शुभ्रजीवन जगण्याची मति मज द्या।।९।।


Rate this content
Log in

More marathi poem from Sangita Birajdar