शुभांगी
शुभांगी
1 min
248
श्री विठ्ठल चरणी ठेविते मस्तक तू
श्री शुभराय सेवी विलीन तू,
चालोनि भक्तीचीये मार्गे
टाकिले समाजसेवेचे पाऊल तू
लावोनि लळा पाखरांना
मायेची माई झालीस तू,
तन्मयता बाळगोनी उरासी
औदार्य जगाला दाविलेस तू
असता साथ चंद्रिकेची तूजला
वर्धिनी उद्योगांची उभारलीस तू,
देउनी पाठबळ कैक ती जणींना
कौतुके पुरस्कारार्थी झालीस तू
धन्य भाग्य माझ्या कवितेचे
ज्याचा गाभा हा आहेस तू,
असो आशीर्वाद मजवरी सदा
माझी शुभा आत्या गं तू
