श्रीराम
श्रीराम
1 min
388
रामनाम बोलती बहुत।
परी चित्त नाही त्यात।।
चित्त जडल्याची खूण।
रामनामात हयगय करू नये जाण।।
रामनाम अंतःकरणाचे आत।
बाह्य प्रारब्ध वागवी तसे राहात।
तेथे काही इच्छा न होता राहे निभ्रांत।।
बाह्य शरीर मिथ्या, 'ते माझे आहे'।
नाशिवंत वस्तु जाणूनि राहे।।
मारुनि खोटी कल्पनावृत्ती।
रामनाम अखंड चित्ती।
समाधान संतोष शांती।।
तुम्ही उत्तमगुणी पाही।
दीनावरी कृपा करावी काही।।
ही आशा धरूनी पोटी।
सांगितल्या सलगीच्या गोष्टी।।
