श्रावणधारा
श्रावणधारा
1 min
392
श्रावणधारा त्या कोसळती
नवयव्वना ओली धरती
कधी ओढुनी शाल धुक्याची
नक्षी काढी दवबिंदुची
सवे घेवुनी कोवळी किरणे
इंद्रधनुचे क्षितीजावर फिरणे
जलसंगित ते गिरीकंदरी
पक्षी गाती घेत भरारी
ओले चिंब रुप मनोहर
बघुनी हर्षित होतो दिनकर
त्या मेघांची प्रणयाराधना
हसुनी झटके ओली ललना
कोसळणाऱ्या श्रावणधारा
घेते टिपुनी अपुल्या अधरा
उंच झुलवत श्रावण झुला
कवेत घेते निळ्या नभाला
अवखळ अल्लड खळखळणारी
श्रावणी भासे धरती न्यारी
आनंदाचा मोर पिसारा
सवे वर्षिती श्रावणधारा
सवे वर्षिती श्रावणधारा.....
