श्रावणातल्या जलधारा
श्रावणातल्या जलधारा
1 min
180
चैत्र वैशाख सरले होते..
पावसाच्या साथीने ज्येष्ठाचे
आगमन झाले होते...
पावसाच्या आगमनाने
निसर्ग फुलला होता..
पाउसामुळे बळीराजाचा
चेहरा फुलला होता..
पाऊस त्याच्यासोबत
मृग नक्षत्र घेऊन आला होता..
पाऊसाचा रंग
त्या मृदेत न्याला होता...
पावसाच्या सरीला
साथ होती नभाची..
काही वेळानंतर
साथ आली इंद्रधनुष्याची...
जाणवू लागले
अंगावरचे शहारे..
आत जाऊन बसले
पक्षी ते सारे...
पावसाची ती एक सर
चिंब भीजून घे
अस सांगत होती
जणू ती सर
माझीच वाट पाहत होती...
आवाज करत होता
बेभान वारा काही वेळास
येत होत्या श्रावणातल्या जलधारा ...!!
