शीर्षक :- माझा दृष्टीकोन
शीर्षक :- माझा दृष्टीकोन
1 min
244
आयुष्या कडे पाहण्याची
जरा वेगळी माझी नजर
आलेल्या संकटाला तोंड
देण्याची ठेवतो मी जिगर
काही खास नसली जरी
माझी इनकमची फिगर
आनंदाने पार करेल हो
मी दुःखाचे सारेच डोंगर
सकारात्मक विचार
मला आत्मबळ देतात
मग सारे नकारात्मक
विचार पळून जातात
दुःख किती आयुष्यात
नसतो मी कधीच उदास
मला कळाले जीवनाचे
अनमोल रहस्य ते खास
सुखास नाही मुकलो
आल्या यातना किती
आनंदाने स्विकारले
हीच होती माझी नियती
