शब्दफुले
शब्दफुले
1 min
472
शब्द फुलांनो आतातरी,
या माझ्या भुवनी
मन भावनांना फुुुटतील वाटा
जे हृदयी वसे नेहमी....
रोज सकाळी बरसू दे माझ्या,
तव नावीन्य हे अंगणी
मैैैैफल अशी ही रंगेल तेव्हा
या माझ्या नयनी....
शब्द स्वरांच्या जुगलबंदीत हे,
मन ही जाईल वाहूनी
रिमझिम अशा या शब्द वर्षावात
शांत होईल भिजूनी....
अंंबरात ह्या शब्दापरी हे,
झेेप घेईल मनही
शब्द मखमली दंवापरीच ते
उमलेल असे हसूनी....
लेेेेखणीतूनी मोतीसम तू,
ये संथ पावलांनी
ओंजळीतूनी निसटून जा तू
या अंतःकरणी....
गानकोकीळेच्या मुखातून जेव्हा,
येशील अवतरूनी
एक संधी तू देऊन जा मज
या ओंजळीत तरंगूनी....
सहा रूतुचा साज असा हा,
ये नेहमीच तू लेेऊनी
मनोहर अशा या मातीच्या
गंंधात जा विरूनी
