शब्द
शब्द
1 min
36
शब्द माझा सखा
शब्द माझे सोबती
माझीया आयुष्यात
शब्दांचीच महती
शब्दांशी मी बोलते
शब्दांबरोबर चालते
माझ्या मनीचे गुज
शब्दामधुनी मांडते
शब्द देती दिशा
शब्द म्हणजे आशा
शब्दांंमुळे कधी-कधी
आयुष्यात हाशा
शब्द म्हणजे तलवार
करी खोलवर वार
घायाळ मनावर
शब्दांची फुंकर हळूवार
शब्द आहेत माध्यम
व्यक्त होतो आपण
शब्दांच्या सोबतीने
मिळते शहाणपण
