सेल्फी
सेल्फी

1 min

165
आयुष्य पुढे जाताना, वेळेला किंमत असताना,
आठवते अचानक एक गोष्ट, ज्यात नेमकी तू नसताना,
काढाविशी वाटते एक सेल्फी, तुझ्यासोबत निखळ हसताना
आठवतोय तो क्षण ज्यावेळी तू मला भेटताना,
मी तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडताना,
तेव्हा वाटे एक सेकंदही जड आहे तुझ्यासोबत न बोलताना
आज तुझी आठवण येताच रडताना,
समोर असलेले निसर्ग पाहताना, झरे वाहताना,
आज नाही तर उद्या, एक तरी सेल्फी काढेल तू सोबत असताना,
तो तोंडाचा मोठा फुगा करुन स्माईल करताना