सैनिक
सैनिक
1 min
220
सैनिक आहेत भरपूर महान ,
'देशासाठी देतात आपला प्राण.
ते खूप असतात शूर ,
त्यामुळे आपल्याला नसते हुरहुर.
त्यांच्यामध्ये असते लढण्याची हिंमत ,
पण आपल्याला वाटत नाही त्यांची किंमत.
शहीद सैनिकांची आठवण काढतो एकदा आपण ,
पण थोड्या दिवसानंतर विसरूनही जातो पटकन.
कितीतरी सैनिकांनी दिले देशासाठी प्राण ,
आतातरी आपण ठेऊया त्याची जाण.
