सावली....
सावली....
1 min
439
आपल्याच सावलीला
सोडून जातोस कसा तू
भुतांच्या दावणीला
मला बांधतोस कसा तू...
माझेच मला कधी
गावले नाही वितभर
प्रेतांच्या टाळुंवरची
ते लोणी खाती रितसर....
खंत नको ती
क्षणाचीही उसंत नको
रोजच्या मरणाला
जीवनाचे रवंथ नको...
घाबरू नकोस तू असा
तुझीच मी सावली आहे
जगण्यासाठी रोजची
दुकानदारी मांडली आहे...
दुकानदारी....
