सावित्री
सावित्री
सावित्री वर्णंनावी काय तुझी महती
शब्दाच्या मर्यादा तुझ्या कर्तृत्वापुढे
तुझ्या प्रत्येक शब्दांसाठी
तुझ्या प्रत्येक विचारातील
कार्यासाठी,क्रुतीसाठी
धैर्यासाठी शब्द माझे अपुरे
तरी माझ्यातल्या स्त्रीत्वाचे शब्द
कार्य अस्तित्व आज तुझ्यामुळे फुललेले
सावित्री वर्णंनावी काय तुझी महती
स्त्रीला ज्ञानाच्या वाटा तु दाखवल्या
स्त्रीच्या प्रगतीचा झेंडा तु रोवला
सावित्री वर्णंनावी काय तुझी महती
बुरसटलेल्या कर्मठ विचारांवर मात करुन
स्त्रीचा हातात ज्ञानाचा दीप दिला
स्त्रीत्वाला हक्क व अधिकाराची जाणिव झाली तुझ्यामुळे
सावित्री वर्णंनावी काय तुझी महती
होतील तुझ्यावर कविता, ग्रंथ, लेख
बसवतील तुला मानाच्या शिखरावर पण
त्याही पलिकडील कार्य तुझे
अचाट तुझा मान
सावित्री वर्णंनावी काय तुझी महती
ज्ञानाचा साक्षात्कार आहे तु प्रत्येक स्त्रीत
मुलीत ,विश्वास राहिल तुझे अस्तित्व चराचरात
