सारीपाट
सारीपाट
1 min
438
सुरुवात सगळं सांगून गेली,
सारीपाटाचा खेळ हा,
किती पटींनी हरला हा
शतरंजचा खेळ हा...
तो उगाचंच शांत होता,
काळाच्या पुढे होता,
सीमेच्या पलीकडलेहे जाणून होता
म्हणूनच तो जगज्जेता होता
प्रवाहातही सगळे होते,
खलाशी मात्र लाटांवर होते,
मी न त्यातला जाणून हा
विजेता मात्र जमिनीवर होता.
शेवटचा हा वेळ हा
काळ सांगून गेला होता,
क्षणात सारं घडूनही सारं
कोणास थांगपत्ताही नव्हता..
