STORYMIRROR

Hrishi Camble

Others

3  

Hrishi Camble

Others

सांग तू मला अशी का आठवतेस

सांग तू मला अशी का आठवतेस

1 min
313

चिवचिव करणाऱ्या पाखरांचा थवा

प्रसन्न उगवलेला दिवस हा नवा

छताच्या फटीतून डोकावणारी सूर्याची किरणं

मंद वाऱ्यच खोलीत माझा भिरभिरण

उमललेल्या फुलासारखी कुठे तू हसतेस

सांग तू मला... 


उजाड अशी दुपारची वेळ

ढगांचा लपंडाव करणारा खेळ

उंच्या झळानी दुपारची भरली होती शाळा

वडाच्या सावलीने सगळ्यांना लावला होता लळा

वाऱ्याची हलकीशी झुळूक होऊन, माझा मनात फसतेस

सांग तू मला.......



लाल करून समुद्राला बुडाला तो रवी

थकला होता उजेड ,बहुतेक झोप त्याला हवी

अशा सांज वेळी, परतीची वाट चंद्राने धरली

आणि स्वागताला ताऱ्यांची गर्दी भरली

एकटा आता किनाऱ्यावर सोबतीला तू नसतेस

सांग तू मला......


गहिवरले रात्र आणि अंधार असा भयाण

प्रकाशाच्या तलवारी झाल्या होत्या म्यान

चांदण्याची खंजीर करते कलोखावर वार

काजव्यानी घेतला ध्यास, मानली न्हवती हार

अशा ही वेळी, शब्दांच्या रुपात कवितेत बसतेस

सांग तू मला....


Rate this content
Log in